कधी रे येशील तू जिवलगा-  7

आधीच्या भागाची लिंक- कधी रे येशील तू जिवलगा- 6

सृजन आणि अभि आज एका पार्टी साठी आले होते… विशेष म्हणजे या पार्टीत सगळ्यात जास्त ट्रान्सजेन्डर पब्लिक होतं… ज्या मुळे सुज्या खूपच मोकळेपणानी  वावरात होता… त्याला ह्या नव्या मित्रांबरोबर खूपच मोकळं वाटत होतं… राहून राहून सखीची जाम आठवण येत होती…

इकडे सखीला निल बरोबर जाण्याशिवाय पर्याय च नव्हता…
ती निल च्या कार्यक्रमात पोचली खरी पण मन अजूनही सुज्याच्या आठवणीत रमलं होतं… तर मधेच अभि आठवून तिला वेगळ्याच एका नात्याबद्दल आकर्षण वाटत होतं… ती मैत्री.. ती आपुलकी ही तिला हवीहवीशी वाटत होती… आज सगळेच जण नीलच्या यशस्वी करिअर बद्दल भरभरून बोलत होते.. अगदी कमी काळात त्यानं स्वतः च असं स्थान निर्माण केलं होतं हॉटेल व्यवसायात… त्याचे बरेच मित्र मैत्रिणीही आले होते… आणि सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या ह्या जोडीवर… आणि नील च्या आणि सखीच्या बाबांनी एक घोषणा केली… नील सखी साखरपुड्याची… सखी हबकली… हे  काय  आक्रीत… मला न  विचारताच  परस्पर कसं ठरवलं ह्यांनी… ती चिडली.. पण इतक्या लोकांसमोर ती घरच्यांना उघडपणे विरोध नाही करू शकली…
साखरपुडा 1 महिन्यानी होता… आणि ती आता लवकरात लवकर तिच्या आईबाबांशी सुज्या बद्दल बोलणार होती…

इकडे तिच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या सुज्यानी चक्क इतकी दारू प्यायली कि त्याला तोल ही सावरता येईना… अभि त्याला घेऊन रूम वर आला… आणि नशेत सुज्या बरळत राहिला… त्याचं सखीला मिस करणं… तिनं  प्रोपोज करूनही नकार देणं… मग पुन्हा गुहागर भेट… अन पुन्हा तिच्या जवळ जाण.. सगळं सगळं त्यानी अभिला नशेत सांगून टाकलं…

इतकं प्रेम करतो हा… आणि पठ्ठ्या कधी बोललाच नाही… पण हिरो … अब मेरी बारी… हरकत नाही…
दोस्ती aahe तुझ्याशी आणि सखी नंतर आलीये आयुष्यात… असं स्वतः शीच बडबडत अभि सखीचे फोटो बघत राहिला… त्यानं एक निर्णय घेतला…
आणि सखी ला मेसेज केला..

Hii princess ! कशी  आहेस… कित्ती मेसेज फोन केले… बाईसाहेब… रिप्लाय द्या कि…
तेरा दिलवाला दोस्त…
नाम तो सुना ही  होगा… अभि…

आणि तो झोपायला निघून गेला… सखी ही चिडल्यामुळे घरी आल्यावर सरळ आई बाबांच्या खोलीत गेली…
आणि खूप तणतणत म्हणाली… का परस्पर निर्णय घेतलात?  माझं  शिक्षण व्हायचंय.. करिअर व्हायचंय ..
नाही करणार मी लग्नबिग्न…
आईनं विचारलं… का ग?  कुणी दुसरं आहे कि काय मनात?..  आणि असेल तर खुळ काढ… नील तुझ्यासाठी उत्तम आहे… आणि लगेच नाही लंग्न लावत आहोत… फक्त साखरपुडा करतोय…
पण मला तो ही नाही करायचाय… प्लीज बाबा… ऐका ना…
आता बाबा काही बोलू नयेत म्हणून आईनेच सूत्र हाती घेतली… आणि सखी ला ठाम पणे म्हणाली… हे लग्न होणार… आणि आम्ही तुझं भलचं करतोय… आता वाद विकोपाला गेला आणि सखी न स्वतः ला कोंडून घेतलं…

आई बाबा समजावत राहिले पण जो वर त्यांनी निलच्या  घरी फोन करून सध्या हा साखरपुडा रद्द करूयात असं कळवलं नाही तो वर दारच उघडलं नाही.. .

आता सखीचा निर्णय ठाम होता… फक्त शिक्षण आणि करिअर… तिनं ज्वेलरी डीझायनिंग चा कोर्स केला होता… कॉलेज करता करता… पण आता ती एका NGO  ला ही जॉइन करणार होती… ती तोच विचार करत निजली…

सकाळी अभि चा मेसेज वाचून ती पुन्हा विचारात अडकली … आणि रिप्लाय म्हणून फक्त हम्म्म्म लिहून पाठवला…

अभि आणि सुज्या ह्यांना एका जॉईंट कार्यक्रमासाठी आमंत्रण आल…खूप मोठी संधि होती… दोघांसाठी… काही मानसिक  तर काही शारीरिक पातळीवरच्या स्पर्धा घेतल्या जाणार होत्या.. ट्रान्सजेन्डर साठी आणि ही स्पर्धा अमेरिकेतल्या एका मोठ्या NGO नी ठरवली होती…

अभि नी सुज्या ला स्पर्धेत उतरायला तयार केलं…
आणि पुन्हा सुज्याच येणं लांबल…
स्पर्धा काहीशी ironman प्रकारातली होती जेणे करून ह्या अशा पद्धतिने ट्रान्सजेन्डर झालेल्या मुलांचा आत्मविश्वास वाढेल… आता ही स्पर्धा होती 3 महिन्यांनी… आणि तयारी साठी सुज्या ला एक कोच नेमला… मुळातच ऍथलेट असलेल्या सुज्यानी खूपच उत्तम प्रगती केली…

इकडे सखीन.. निल ला भेटून तिच्या भविष्यातल्या योजनांबद्दल सांगितलं आणि हे ही कबूल केल कि तिचं सृजन वर प्रेम आहे… आणि सध्या तरी ती शिक्षण आणि करिअरलाच महत्व देणार आहे.. तिचा ठाम निर्णय ऐकून… मनावर दगड ठेवून… नील नी माघार घ्यायचा निर्णय घेतला… पण अद्याप त्यानं तो विचार सखी ला सांगितला नाही… त्याला अजूनही वाटत होतं… कि ती त्यालाच मिळणार..

सखीनं ज्या NGO त काम करायला सुरुवात केली त्यांच्या  कडून 4 स्वयंसेवक अमेरिकेत होणाऱ्या स्पर्धेसाठी जाणार होते… अर्थात ती नव्यानेच जॉइन झालेली असल्यामुळे ह्यात सखीच नाव न्हवतं..
तिला फारच वाईट वाटलं… आयती संधी हुकली… सुज्या ला भेटायची … कारण तिचे बाबा काही तिला इतके पैसे मोजून पाठवणार नव्हते…

#..सखी आणि सुज्यची भेट होईल? निल चा निर्णय तक बदलेल?  आणि अभि… त्यानं नक्की काय ठरवलंय?…

क्रमशः..

पुढील भागाची लिंक- कधी रे येशील तू जिवलगा- शेवटचा भाग
Image by Gerd Altmann from Pixabay 

2 thoughts on “कधी रे येशील तू जिवलगा-  7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!